मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अगरवाल यांचा फोटो सध्या व्हाय़रल होतोय. रूबल अगरवाल या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देत नसल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या फोटोमागचं व्हायरल सत्य आम्ही पडताळून पाहिलं, २४ तास डॉटकॉमच्या हाती आणखी एक फोटो लागला, यात जिल्हाधिकारी झेंड्याला सॅल्यूट करत असताना दिसून येत आहेत. यातील एक फोटो खरा आणि एक खोटा तुम्हाला वाटेल.


मात्र दोन्ही फोटो हे बरोबर आहेत, जिल्हाधिकारी यांनी झेंड्याला सलामी दिली नाही, असं काहीही झालेलं नाही. खरंतर फोटो कॅमेऱ्याचा शटर स्पीड हा आपल्या हालचालीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो, यात पापणी लवण्याआधी कॅमेऱ्याचं शटर कितीतरी वेगाने पडत, शटर उघडून सेकंद होण्याच्या कितीतरी लवकर लागतं, या दरम्यान जे कोणतं चित्र समोर असतं ते कॅमेऱ्यात उमटतं.


पहिल्या क्लिकवर जिल्हाधिकारी सॅल्यूट करताना दिसतायत, तर इतरांपेक्षा सेकंदाआधी, सॅल्यूट करून जिल्हाधिकाऱ्यांचा हात खाली गेला आहे, आणि दुसरा फोटो पाहिल्यावर तुम्हाला असंच वाटेल, की त्यांनी सलामी दिलीच नाही, पण असं काहीही झालेलं नाही. व्हॉटस अॅपवर व्हायरल होणाऱ्या फोटोमागचं हे आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत. तेव्हा व्हॉटस अॅपवरील सर्वच सत्य असतं असं नाही, सत्याची पडताळणी झाल्याशिवाय कोणताही फोटो पुढे पाठवू नका.