पालघर : आदिवासी  विकास  मंत्री  विष्णू  सवरा  यांच्या  विक्रमगड  मतदार संघातील मोखाडा  नगरपंचायत आणि विक्रमगड  नगरपंचायतीच्या निवडणुकीत  भाजपचा दारूण पराभव  झाला  आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोखाडा नगरपंचायत भाजपला एक जागा, तर विक्रमगड  नगरपंचायतीत दोन जागा अश्या फक्त तीन जागा मिळाल्या आहेत.  तर भाजपचे खासदार  चिंतामण वनगा व भाजपचे आमदार  पास्कल  धनारे  यांच्या  तलासरी नगरपंचायतीत भाजपला चार जागा  मिळाल्या  आहेत.  


एकूणच पालघर  जिल्ह्यातील तीनही  नगरपंचायतीच्या एकूण 51 जागांपैकी फक्त 7 जागां मिळाल्या असून भाजपचा दारूण  पराभव  झाला आहे. 


तलासरी नगरपरिषदेवर 17 पैकी  माकपने 11 जागा जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्यात, मोखाडा  नगरपंचायतीवर शिवसेनेने 17 पैकी 14 जागा जिंकून आपला गड साबूत ठेवलाय. 


तर विक्रमगड  नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी  विक्रमगड विकास आघाडीने 7 जागा, जागृती पॅनेलचे 6 , शिवसेना -1, राष्ट्रीवादी  काँग्रेस - 1, आणि भाजपला दोन जागा मिळाल्या  आहेत.  एकूणच  पालघर  जिल्ह्यातील तीनही  नगरपंचायतीच्या  निवडणुकीत  भाजपचा  दारूण  पराभव  झाला  आहे.