मुंबई : महाराष्ट्रातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया वर्तविलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्यांतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.


यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वांचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले.


प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय(पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे... 


रायगड - 71


रत्नागिरी - 64


सिंधुदुर्ग - 70


नाशिक - 68


पुणे - 70


सातारा - 70


सांगली - 65


सोलापूर - 68


कोल्हापूर - 70


अमरावती - 67 


गडचिरोली - 68


काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडले. मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.