मिरज : सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढी ४८ तासाच्या आत, जलराणी मिरजेतून, लातूर कडे रवाना होईल असा विश्वास रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केलाय. एका डब्यात सुमारे अडीच लाख लीटर पाणी मावतं. असे पन्नास डब्बे असणारी पहिली गाडी मिरजमध्ये सज्ज होतेय. एका वेळी 10 डब्ब्यांमध्ये पाणी भरण्याची सोय आहे. 


मिरज स्थानक हे दक्षिण रेल्वेचं एक प्रमुख स्थानक आहे. इथे मोठ्याप्रमाणावर प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीत कुठलाही अडथळा येणार नाही, किंवा पाण्याची कमतरता भसणार नाही याचीही काळजी रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागत आहे. या सगळ्याचं भान ठेवून लवकरात लवकर पाण्यानी भरलेल्या वॅगन्स लातूरकडे रवाना करण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.