रायगड : विरोधकांना मतदान केल्यानं गावाचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बोर्ली ग्रामपंचायतीनं हा तालीबानी कारभार चालवला आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबंद इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं. याचा राग धरत या गावला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीनं बंद करुन टाकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणीच्या दिवशीच झालेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे जावून पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला. त्यानंतर गावातील नळकोंडाळी तोडण्यात आली . गेल्या चार दिवसांपासून या गावात पाण्याचा थेंब नाहीये. पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकावं लागतंय..आणि या सर्व प्रकारात धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुन्हा सुरू करणारया ग्रामस्थांविरूदध मोटारचोरीची तक्रार पोलीसात करण्यात आली . यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आता तेथे बंदोबस्त लावला असून या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


पाहा व्हिडिओ