धुळे : जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला, पाणी भरण्यावरुन झालेल्या भांडणात महिलेनं स्वतःलाच पेटवून घेतले. पाण्याच्या एका थेंबासाठीच्या संघर्षातून ही धक्कादायक बाब घडली. दत्ताने गावातल्या या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणी भारण्यावरून झालेल्या भांडण झाले. दत्ताणे गावात पाण्याचं कमालीचं दुर्भिक्ष असल्याने पाण्याच्या एक एका थेंबासाठी येथे संर्घष करावा लागतो. दत्ताणे गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. गावात टॅंकर येताच पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. पाण्याचे टॅंकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. या वेळी भारतीबाई अमोल देसले-पाटील आणि हिराबाई भिल, सुनीता भिल, केसरबाई भिल यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला.


वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हिराबाई भिल हिने घरातून लाकडी काठी आणून भारतीबाई यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर अपमान सहन न झाल्याने भारतीबाई देसले यांनी स्वतःला पेटवून घेतले. यात भारतीबाई गंभीररीत्या भाजल्या. उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 


या प्रकरणी हिराबाई भिल हिच्यासह तिघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. प्रशासनाकडून अद्याप उपाययोजना होत नसल्याने टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पाणीटंचाईच्या धगीतून टॅंकरचे पाणी भरताना महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले.