नांदेड : मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत नांदेडमधले पाणी माफिया मात्र स्वतःचं उखळ पांढरं करुन घेण्यात मग्न आहेत. या मस्तवाल पाणी माफियांनी थेट नांदेड पालिकेच्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मिनरल वॉटरचा धंदा सुरु केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणी माफिया मात्र थेट पालिकेच्याच पाण्यावर डल्ला मारत आहे. या पाण्यावर लाखो रुपये कमवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पाणी चोरी करुन लाखो रुपये कमावत असल्याचा प्रकार नांदेड मध्ये उघड झालाय. 


मिनरल वॉटर बनवण्याचा धंदा


नांदेड महापालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर यांनी स्वतः अशा कारखान्यांवर धाडी टाकून कारवाई केली. महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनमध्ये छोट्या पाईपद्वारे, हे पाणी माफिया पाणीचोरी करत होते. चोरलेल्या पाण्यातून मिनरल वॉटर बनवण्याचा धंदा शहरात अनेक ठिकाणी सुरु होता. ही माहिती मिळताच पालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांनी नांदेड शहरातील एकूण ४ मिनरल वॉटर कारखाण्यावर धाडी टाकल्या.


पालिकेची कोणतीही परवानगी नाही!


पालिकेच्या मुख्य पाईपलानमधून पाणी चोरुन वॉटर फिल्टर प्लांट चालवले जात असल्याचे उघड झाले. यापैकी कुठल्याही प्लांटने महापालिकेची परवानगीही घेतली नसल्याचे उघड झाले आहे. हे सर्व वॉटरप्लांट सिल करण्यात आले आहेत. बोअर मारून या प्लांटमध्ये त्यावर प्रक्रिया करुण पाणी फिल्टर करुन विकल्या जाते. पण आता जमिनितील पाणीपातळी खाली गेल्याने सर्व बोअरींगला पाणी येत नाही. त्यामुळे चोरीची शक्कल माफियांनी लढवली.


१ लीटरसाठी दीड लीटर पाणी वाया


दुष्काळात पलिकेच्या पाईपलाईनमधून पाणी चोरी करण्यात आलेल्या पाण्यावर माफिया कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. शिवाय १ लिटर शुद्ध पाणी तयार करण्यासाठी दीड लीटर पाणी हे वाया घालवत असल्याचे पुढे आलेय. दरम्यान, आयुक्तांनी कडक पावले उचलत कारवाई केली. ही कारवाई तीन दिवस सुरुच राहणार आहे. सर्व अनधिकृत वॉटर प्लांटवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त सुशील खोडवेकर दिली.