अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे
समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.
पुणे : समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.
दौंड तालुक्यातील भांडगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जनतेची ज्यांनी लूट केली, त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्याच्या यापूर्वीच्या कारभाऱ्यांनी केवळ लुटण्याचे काम केले आहे.
कांबळे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये टाकणार असल्याने मला वेगळे निरोप पाठवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मी कसल्याही दादागिरीला घबरणारा नाही.