रायगड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व ब्रिटीशकालीन तसेच धोकादायक पुलांचं सर्वेक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे. महाड पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई या दोन बस सावित्री नदीत पडल्याने वाहून गेल्या आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेल्याने या दोन एसटी बस वाहून गेल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.


हा पूल १९२८ साली इंग्रजांनी बांधला होता, थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी हा पूल सोयीस्कर होता. हा पूल धोकायदायक असल्याचं पत्र लंडनहून संबंधित प्रशासनाला आलं असल्याचंही सांगण्यात येतंय. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.