पुणे : पुण्यातल वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळं रद्द होण्याचीच चिन्ह अधिक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनबर्नला हायकोर्टासह जिल्हाधिकाऱ्यांचीही अजून परवानगी मिळालेली नाही. बुधवारपर्यंत परवानगी न मिळाल्यास फेस्टिव्हल रद्द करणार असल्याची माहिती सनबर्नचे आयोजक आणि व्यवस्थापकीय संचालक हरिंदर सिंग यांनी दिलीय. 


दरम्यान, गोवा सरकारचे सनबर्नकडे पैसे थकलेले नाहीत उलट गोवा सरकारकडेच आपले पैसे असल्याचा दावा सिंग यांनी केलाय. सनबर्नमुळे गोव्यामध्ये 800 कोटींची उलाढाल झाली. गोव्यामधील फेस्टिवल पुण्यात होत असल्याने न्यू इयर दरम्यान गोव्यातील गर्दी थंडावली असल्याचा दावाही त्यांनी केलाय.


सनबर्नचा खोटारडेपणा उघड


वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या अडचणी आणखीनं वाढल्या आहेत. पुणे जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना झटका दिलाय. आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले आहेत.


एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टीव्हलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. आयोजकांनी करमणूक कर भरताना तिकीट विक्रीची माहीती दिलेली नसल्याचा ठपका जिल्हाधिका-यांनी ठेवलाय. त्यामुळं सनबर्नच्या आयोजकांचा खोटारडेपणा उघड झालाय. 


सनबर्नच्या आयोजकांनी 27 लाखांचा करमणूक कर भरलाय. मात्र किती तिकीट विक्री करणार याची माहीतीच दिलेली नाही. त्यामुळं तिकीट विक्रीची माहिती देण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.