ट्रॅफिक झाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी स्वत: ट्रक चालवून केला बाजुला
ट्राफिक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजन यांनी चक्क ट्रक चालवला आहे. जळगाव येथे दुरुच्या नशेत चालक आपला 14 चाकी ट्रक रस्त्यातच सोडून झोपला होता. या अवजड ट्रकमुळे हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. याच मार्गावरुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जात होते.
जळगाव : ट्राफिक कोंडी फोडण्यासाठी गिरीश महाजन यांनी चक्क ट्रक चालवला आहे. जळगाव येथे दुरुच्या नशेत चालक आपला 14 चाकी ट्रक रस्त्यातच सोडून झोपला होता. या अवजड ट्रकमुळे हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. याच मार्गावरुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जात होते.
हायवेवर झालेली वाहतूकीची कोंडी पाहून ते स्वता गाडीतून उतरले आणि रस्त्याच्या मधोमध उभा असलेला १४ चाकी ट्रक त्यांनी स्वता चालवत बाजूला काढला. या नतंर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.. हा सर्व प्रकार काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ट्रक चालवताना दिसत आहेत. तर महामार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्यात. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मद्यधुंत ट्रकचालकाला अटक केली.
पाहा व्हिडिओ