पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात २५ साप मरण पावल्याने एकच खळबळ उडालीय. प्राणी संग्रहालयात सर्प मित्रांनी दाखल केलेल्या सापांची योग्य निगा राखली गेली नसल्यामुळं सापांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहिणाबाई प्राणी संग्रहालयात मोठ्या प्रमाणात साप आहेत..नागरिक त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या प्राणी संग्रहालयात विविध ठिकाणाहून पकडलेले साप ही सर्पमित्र मोठ्या आणून देत असतात.


अशाच सर्प मित्रांनी जमा केलेल्या सापांची योग्य पद्धतीन निगा राखली गेली नसल्यामुळ जवळपास २५ साप मृत्युमुखी पडल्याची धक्का दायक घटना घडलीय.. सर्पमित्रांनी मात्र ही संख्या ५० असल्याचा दावा केलाय.


तर दुसरीकडं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सापाच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिलाय. सापांची निगा राखणारे कर्मचारी रजेवर असल्यामूळ सापांचा मृत्यू झाल्याचं मुख्य प्राणी वैद्यकीय विभागाचे प्रमुख सतीश गोरे यांनी स्पष्ट केलंय.


महापालिका अधिकाऱ्यांनी चूक मान्य केलीय हे जरी खार असलं तरी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपनावर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे...!