ऊसतोड कामगारांना दिल्या जातायत जुन्या नोटा
ऊसतोड कामगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचं समर्थन करतायत.
इंदापूर : ऊसतोड कामगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचं समर्थन करतायत.
मात्र, या ऊसतोड कामगारांच्या मुकादमांना त्यांना उचली पोटी पाचशे आणि हजारांच्याच नोटा दिल्यात. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.
५०० आणि १०००च्या नोटा कुठेच चालत नसल्यानं घर चालवताना आता या कामगारांची कसरत होतेय. त्यातच बँकेत खातं नाही. त्यामुळेही मोठ्या अडचणींना सामना त्यांना करावा लागतोय.