पुणे : 'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत आहे. 


राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागात सध्या प्रायोगिक तत्वावर वाय-फाय सुविधा देण्यात आलीय. 


सध्या एसटीच्या ५० गाड्यामध्ये वाय - फाय सुविधा सुरु करण्यात आलीय. ती यशस्वी झाल्यानं लवकरच ३५० गाड्यांमध्ये वाय - फाय सुरु करण्यात येईल. 


डिसेंबरनंतर एसटीच्या इतर विभागातील गाड्यांमध्ये देखील वाय - फाय सुविधा दिली जाणार असल्याचं पुणे परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय.