`उमेदवार विजयी केलात तर निधी कमी पडू देणार नाही`
नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा जोर आता अधिकच वाढलाय.
जालना : नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा जोर आता अधिकच वाढलाय. जालना नगरपालिका निवडणुकीत युतीने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत मुनगंटीवार यांनी युतीच्या उमेदवाराला विजयी केल्यास शहराच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही असं वक्तव्य केलं आहे.
सत्तेच्या चाव्या युतीकडे असल्याने शहराच्या विकासासाठी युतीने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला निवडून द्याव असं आवाहनही मुनगंटीवारांनी जालनाकरांना केलं. जालना नगराध्यक्ष पदासाठी भाजप,शिवसेनेचा निवडणूक चिन्हावर एकही उमेदवार नसून युतीने अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी पुरस्कृत केलं आहे. याच उमेदवाराच्या प्रचारासाठी जालन्यातील मामा चौकात झालेला सभेला हजेरी लाऊन जालनाकरांना आवाहन केलं.