भाजपला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेसची मदत घेणार?
औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं मदत मागितली तर सत्ता स्थापन करायला मदत करू, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं मदत मागितली तर सत्ता स्थापन करायला मदत करू, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यामुळे सत्तार यांच्या या ऑफरचा शिवसेना काय विचार करते आणि भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि काँग्रेस अशी नव्या राजकारणाची नांदी पाहायला मिळते का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये २३ जागा जिंकून भाजप एक नंबरचा पक्ष बनला आहे. तर शिवसेनेला १८, काँग्रेसला १६, राष्ट्रवादीला ३ मनसेला आणि इतरांना १ जागा मिळाली आहे.