पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
पाणीटंचाईमुळे यंदा गरज पडल्यास विद्यार्थ्यांच्या क्लासेसवर बंदी घातली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली आहे.
लातूर : पाणीटंचाईमुळे यंदा गरज पडल्यास विद्यार्थ्यांच्या क्लासेसवर बंदी घातली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली आहे.
दरवर्षी सुट्यांमध्ये राज्यभरातून शिकवणीसाठी हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी लातुरात दाखल होतात. आधीच स्थानिक लोकांना पिण्याचं पाणी पुरवू शकत नाही, त्यात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थी संख्येमुळे प्रशासनावर त्याचा ताण पडू शकतो, त्यामुळे क्लासेस बंद करणं हाच एक पर्याय असू शकतो असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.