मुंबई : निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विरोधकांकडे विरोधासाठी मुद्देच नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर विशेष भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यसरकार कर्जमाफीच्या बाजूनेच आहे. वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 


मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे


अधिवेशनात 23 विधेयक प्रस्तावित आहेत, 3 विधेयक प्रलंबित


शेतकरी नुकसानभरपाई 894 कोटी रुपये खरीप रब्बीसाठी दिले आहेत, लातूरमध्ये 402 कोटी रुपये देत आहे


राज्य सरकारने 17 लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे, रु. 5050 असा भाव दिला आहे. आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक खरेदी आहे


पीक जास्त आल्याने सरकारची गोदामे भरली, खाजगी घेतली आहेत. 3 वर्षानंतर शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले आहेत. कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे


निवडणुकांमधल्या निकालानंतर विरोधी पक्ष निराशेत आहेत, विरोधी पक्षालाही सोबत घेऊन निर्णय घ्यायचा आहे


सोलर फीडरची योजना राबवत आहोत, सोलर फीडर मुळे दिवसाही शेतकरी यांना वीज मिळेल