परभणी : 43 वर्षीय महिलेवर मागील सहा वर्षापासून आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे त्या नराधमांनी त्या महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि ब्लॅकमेल करून पैसे मागितले. 


क्लिप डिलीट करण्यासाठी या पाच जणांनी महिलेला दीड लाखांची मागणीही केली होती. पैसे नसल्यानं या महिलेनं आरोपींना आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत पाच नराधमांविरोधात नानल पेठ पोलिसात बलात्कार करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलंय.