शिरपूर : धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालतीबाई निकुंभे यांना ताप असल्यामुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यासह तालुक्यात उष्माघाताच्या त्या पहिल्या बळी ठरल्या आहेत. 


दरम्यान, आदल्या दिवशी खोकला येत असल्यामुळे मालतीबाई निकुंभे यांना रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांना ताप नव्हता. मात्र, दुसऱ्या दिवशी शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर त्याना अचानक ताप वाढल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्या शरीरात १0६ डिग्रीपर्यंत ताप होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी प्राथमिक  माहिती समोर आली आहे. मालतीबाई शेतात फेरफटका मारायला गेल्या असतांना त्यावेळी तापमानाचा पारा हा 40 अंशावर होता.