उल्हासनगरमध्ये खडड्याने घेतला महिलेचा बळी
उल्हासनगरमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने 45 वर्षीय महिलेचा बळी घेतलाय. रामरती गुप्ता असं या महिलेचं नाव आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने 45 वर्षीय महिलेचा बळी घेतलाय. रामरती गुप्ता असं या महिलेचं नाव आहे.
शहरातल्या शांतीनगर परिसरात त्या खाणावळ चालवायच्या. बुधवारी सकाळी मुलगा देवेंद्रसह बाईकवरुन रामरती खाणावळीकडे जात होत्या. त्यावेळी कल्याण बदलापूर मार्गावरुन जाताना उल्हासनगर 17 सेक्शनजवळ देवेंद्र याला रस्त्यावरील खड्डा दिसला नाही. त्यामुळं त्यानं अचानक ब्रेक लावला.
यामुळं देवेंद्रचं बाईकवरील नियंत्रण सुटून दोघंही रस्त्यावर कोसळले त्यावेळी मागून येणारा टँकर रामरती यांच्या अंगावरुन गेला आणि यांत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीय.