नंदुरबार : नंदुरबारमध्ये एका महिला शेतक-याने आत्महत्या केलीय. इथल्या कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मका विकून या महिलेने 60 हजाराचा चेक बडोदा बँकेत टाकला होता.. या बँकेतून या महिलेला 10 हजार रुपये मिळाले.


जनधन मधून महिन्याला 10 हजारच निघेल असे बँक अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानंतर नैराश्यातून या महिला शेतक-यानं आत्महत्या केलीय.


याच तणावातून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केलाय.