ठाणे : ठाण्याच्या मुंब्र्यामधील शिबली नगर येथे एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांसह इमारतीच्या १५व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी मिळालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरीन शेख असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसोबतच्या वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. 


म्हाडाच्या इमारतीच्या १५व्या मजल्यावरुन तिने आधी आपल्या ७ वर्षाचा तौफिक आणि ४ वर्षाची आमरित हिला फेकून दिले. त्यानंतर स्वत: उडी घेत आत्महत्या केली. 


दरम्यान, या ७ वर्षीयय तौफिक वाचला असून त्याच्यावर  मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आई शिरीन शेख आणि आमरित हिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.