ठाणे : आज जागतिक चिमणी दिवस आहे, २० मार्च हा दिवस आज जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चिमण्यांची संख्या झपाट्यानं घटत आहे. प्रत्येकाच्या लहानपणीच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असेलल्या चिमण्यांचं संवर्धन व्हावं या करता, ठाण्यातल्या संकल्प इंग्लिश स्कूलनं अभिनव उपक्रम राबवला आहे. 


जागतिक चिमणी दिनानिमित्त या चिमुकल्या आपल्या हातांनी चिमण्यांसाठी घरकुल बनवलं आहे. उन्हाळ्यात चिमण्यांसाठी खिडकीत, बागेत, शेतात पाण्यानी भरलेली भांडी ठेवण्याविषयी आव्हान केलं जात आहे, अनेकवेळा कडक उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने चिमण्याचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो.