यवतमाळ : यवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या केली आहे. क्षुल्लक वादातून व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२९ वर्षीय  निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून  बेपत्ता होता.


व्हॉट्सअॅप ग्रुपवर समाज सुधारकाच्या कार्यावरुन वाद झाला, यातून निखिलने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तसेच,  पोलिसांनी चौकशीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपमधील ४ तरुणांना ताब्यात घेतले आहे.