पुणे : जिल्ह्यातील खडकी येथे एका युवकांने वीरुगिरी केली. खडकी बाजार येथे पाण्याच्या टाकीवर उडी मारण्याचा प्रयत्न या युवकाने केला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला जीवदान दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमर गोप नारायण (35) हा पाण्याच्या टाकीवर चढला आणि जमिनीवर उडी मारण्याच्या तयारी होता. याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने तात्काळ औंध अग्निशमन केंद्राला माहिती दिली आणि सूत्रे हलली. येथून अग्निशमन दलाची गाडी सोडण्यात आली. दलाचे जवान पोहोचताच तेथील परिस्थिती गंभीर असल्याचे जाणवले. उडी मारणारा युवक टाकीच्या सज्जावर बेशुद्ध असल्याचे दिसले.


अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत टाकीवर चढून त्याला दोर आणि सेफ्टी बेल्टच्या सहाय्याने सुमारे दोनशे फूट खाली सुरक्षित जमिनीवर आणले आणि त्याला जीवदान दिले. अमरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.