पुणे : व्हॉट्स अॅप ग्रुपवरील चॅटिंगदरम्यान बऱ्याचदा शाब्दिक चकमकी होत असतात. त्यामुळे अनेक ग्रुप बंदही होतात किंवा काही सदस्य तो ग्रुप सोडतात. परंतु, व्हॉट्स अॅप ग्रुपवरच्या एक कॉमेंटमुळे पुण्यातील कॉलेजचा विद्यार्थी अक्षय दिनकर आज हॉस्पिटलमध्ये आहे.


डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयच्या कॉलेजमधील २०-२२ विद्यार्थ्यांनी आज त्याला बेदम मारहाण करून डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. व्हॉट्स अॅप ग्रुपवरील एका कॉमेंटमुळेच हा प्रकार घडल्याचं समजतं. 


 ५ विद्यार्थ्यांना अटक


गरवारे महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांमध्ये वादामधून झालेल्या मारहाण प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शिवाजीनगर न्यायालयानं २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाआधीच व्हॉट्स अॅप ग्रूपचं नाव का बदललं या क्षुल्लक कारणावरून हा वाद सुरु झाला आणि अगदी  मारामारीपर्यंत पोहोचला.