नवी मुंबई : कोब्राला किस करणं नवी मुंबईतल्या एका सर्पमित्र तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कोब्राला किस करून फोटो काढताना सर्पदंशांना सोमनाथ म्हात्रेचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमनाथ हा नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरमध्ये राहत होता. 2 फेब्रुवारीरोजी ही घटना घडली आहे. बेलापूरमध्ये कारमध्ये कोब्रा असल्याची माहिती सोमनाथला मिळाल्यावर तो तिकडे गेला. या कोब्राला घेऊन सोमनाथ दुसऱ्या ठिकाणी गेला आणि तिकडे त्यानं कोब्राला किस केलं, याचवेळी कोब्रानं दंश केला आणि सोमनाथला त्याचा जीव गमवावा लागला.