प्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या
लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.
कल्याण : लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.
इलियास शेख असे २७ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. इलियासचे त्याच्या प्रेयसीशी लग्न ठरले होते. ही प्रेयसी त्याच्या नात्यातलीच होती. मात्र लग्नापूर्वीच ही प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत पळाली.
त्यामुळे इलियासचे लग्न प्रेयसीच्या लहान बहिणीसोबत ठरवण्यात आले. मात्र जसा साखरपुडा पार पडला तेव्हा त्या बहिणीने लग्नास नकार दिला. यामुळे निराश झालेल्या इलियासने थिनर पिऊन आत्महत्या केली. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहिली. या चिठ्ठीत त्याने पुरुषांसाठीही संरक्षक कायदे बनवण्याची मागणी केलीये.