मुंबई : भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. शिवसेनेबरोबर संघर्ष जर वाढला असता तर त्याचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर प्रतिकूल परिणाम झाला असता. 


२. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाऊ देणे भाजपला राजकीय दृष्ट्या परवडणारे नव्हते.


३. शिवसेनेला शत्रू क्रमांक एकची वागणूक दिल्यास राज्य सरकार अस्थिर राहिले असते. 


४. राज्यसरकार स्थिर झाले असून सरकारचा कालावधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.


५. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कायम राहणार असून राज्यात पक्षावरील पकड वाढणार आहे.


६. राज्यसभेत भाजपला मित्रपक्षांची काही प्रमाणात गरज आहे.


७. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येत असल्याने शिवसेना सोबत असणे भाजपच्या हिताचे आहे.


८. देशभरात विरोधी पक्ष एकवटण्याची चिन्ह होती म्हणून शिवसेनेशी संघर्षाची ही योग्य वेळ नव्हती.


९. मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमून शिवसेनेला वेठीस धरणं भाजपला शक्य होणार आहे.


१०. भाजपच्या या निर्णयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा आपला जनाधार वाढविण्यासाठी संघर्ष आणि परिश्रम करावा लागणार आहे.