दीपक भातुसे, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाचं आज मुंबईत त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या पहिल्याच दिवशी 'मेक इन इंडिया'च्या निमित्तानं काय काय घडलं... ते जाणून घेऊयात...


- 'मेक इन इंडिया सप्ताहा' च्या पहिल्या दिवशी पोलंड, फिनलंड आणि जपानच्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा


- महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला


- महाराष्ट्र पॅव्हेलियनला परराष्ट्राच्या शिष्टमंडळाच्या आवर्जून भेटी 


- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'मेक इन इंडिया सप्ताहा'चे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस दुपारी अडीचच्या सुमारास महाराष्ट्र पॅव्हेलिअनमध्ये आले


- महाराष्ट्र पॅव्हेलिअनमधील बैठक कक्षात पोलंडचे पहिले उपपंतप्रधान प्रा.ग्लिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली


- पर्यटनवाढीसाठी महाराष्ट्र राज्य 'महाराष्ट्र-२०१७ भेट वर्ष' म्हणून साजरे करीत आहे, यात पोलंडने सहभागी व्हावे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोलंडच्या शिष्टमंडळालाही यासाठी आमंत्रण दिलं


- फिनलंडचे पंतप्रधान युहा सिपीला यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा यावेळी फिनलँडच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली


- जपानचे उपमंत्री योसुकी टाकाजी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, मेट्रो-३ प्रकल्प, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडॉर प्रकल्प याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली


- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प २०१९ पूर्वी पूर्ण करायचा असुन त्यासाठी जपानचे सहकार्य अपेक्षित आहे. या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने कामास गती देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जपानच्या उपमंत्र्यांना केली


- अहमदनगर जिल्ह्यातील सुपा इथं येथे औद्योगिक वसाहत उभारण्याच्या जपानच्या प्रकल्पाला गती देण्यात येईल, या प्रकल्पाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितलं