मुंबई : मुंबईसह राज्यात विविध भागांत केबल सेवेसाठी आज ग्राहकांना दरमाह 250 ते 300 रुपये मोजावे लागतात. आता तुम्हाला 130 रुपयांत किमान 99 चॅनेल बघता येऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दूरसंचार नियमन प्राधिकरण(ट्राय)ने ग्राहकांना 100 ‘फ्री टू एअर’ वाहिन्या अवघ्या 130 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याच प्रस्ताव आणला आहे. त्यानंतरही ग्राहकाला पैसे भरून काही वाहिन्या हव्या असतील तर त्याचे पाहिजे त्या वाहिनीचे पैसे भरावे आणि त्या पाहाव्या अशी सूचनाही या प्रस्तावात करण्यात आली आहे.  


नव्या प्रस्तावानुसार सध्या उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी 100 एसडी ‘फ्री टू एअर’ अर्थात मोफत वाहिन्या ग्राहकांना अवघ्या 80 रुपयांत उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी कंपन्यांनी 25 वाहिन्यांचा एक संच 20 रुपयांत उपलब्ध करून द्यायचा आहे. यातील किती व कोणते संच घ्यायचे हा निर्णय ग्राहक घेऊ शकणार आहेत.


यावर ग्राहक व्यवस्थापन, बिलिंग, तक्ररी निवारण, कॉल सेंटर्स आदी सुविधांचे 50 रुपये असे मिळून ग्राहकांना केवळ ‘फ्री टू एअर’ वाहिन्यांसाठी जास्तीत जास्त 130 रुपये आकारण्याची सूचना करण्यात आली आहे.