मुंबई : राडेबाजी.. बंडखोरी... आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी तब्बल दहा हजार पाचशे अर्ज आले असून त्यापैकी आठ हजार अर्ज ऑनलाईन आलेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अशा प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी सकाळपासूनच ढोलताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले. 


दुसरीकडे नागपूर पालिका निवडणुकीच्या 151 जागांसाठी  एकूण 1809 उमेदवारी अर्ज दाखल झालेत.  तर पुणे पालिकेसाठी 2661 अर्ज दाखल झालेत. अर्ज मागे घेण्याची मुदत सहा फेब्रुवारीपर्यंत असून त्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतील ते स्पष्ट होईल.