नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरखैरणेमधून बेवर्ली पार्क सेक्टर 14 मध्ये राहणाऱ्या हंसराज अहीर आणि रमेश गोहिल या दोन व्यापाऱ्यांकडून ही रोकड जप्त करण्यात आलीय.


या दोघांनी एवढी मोठी रक्कम कुठून आली? याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, इनकम टॅक्स विभागाला या संदर्भात कळवण्यात आले आहे. 


दरम्यान, उल्हासनगरमध्ये देखील 9 लाख 76 हजार रूपयांच्या नव्या नोटा मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तीन व्यापाऱ्यांकड़े ही रक्कम सापडली याप्रकारणी नोटां कुठून आल्या याबद्दल समाधानकारक उत्तरं तीन व्यापारी देवू न शकल्याने पोलिसांनी सदर नोटा ताब्यात घेतल्या आहे. 


सविस्तर चौकशीसाठी हे प्रकरण आयकर विभागला वर्ग करण्यात आलंय. उल्हासनगर शहरातील आचल पॅलेस या हॉटेल समोरून तीन इसम दुचाकी वरून चालले असताना उल्हानगर पोलिसांनी त्यांना अडवलं. त्याच्यांकडून ही रक्कम मिळाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त  माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे तिघेही कपडा व्यापारी असल्याचं समजतं.