पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेला २ लाख लोकांची भेट
राणीबागेतील पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली आहे. मागील आठवड्यात पेंग्विनचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी बच्चे कंपनीसह मोठी गर्दी केलीय.
मुंबई : राणीबागेतील पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली आहे. मागील आठवड्यात पेंग्विनचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी बच्चे कंपनीसह मोठी गर्दी केलीय.
राणीबागेच्या इतिहासात आत प्रवेशासाठी एवढ्या मोठ्या रांगा पहिल्यांदाच लागल्या आहेत. वर्षभरात 17-20 लाख पर्यटक राणीबागेला भेट देत असले तरी या आठवडाभरात तब्बल २ लाख लोकांनी राणीबागेला भेट दिली आहे.
एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं प्रशासनालाही अवघड जात असून अनेक लोक उद्यानातील झाडे, फुले, लॉनची नासधूस करतायत. काहीजण आपल्या मुलांना शोभेच्या धबधब्यात खेळण्यास सोडत असल्यानं अशा लोकांवर नियंत्रण तरी कसं ठेवायचं असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. प्रचंड गर्दी पेंग्विन पाहण्यासाठी येत असली तरी पेंग्विन मात्र आपल्याच दुनियेत मस्त आहेत.