मुंबई: मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक आहे का या कुत्र्यांना मारण्यात आलं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीस फॉर ऍनिमल वेलफेअर असोसिएशन (पावा) या एनजीओला मीरा-भाईंदरमध्ये 5 कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची माहिती 6 मेला मिळाली, तेव्हा  या एनजीओनं पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार दाखल केली. 


या कुत्र्यांना ज्यांनी खायला घातलं त्याचं सीसीटीव्ही फूटेज आम्ही दिलं आहे, तसंच या मेलेल्या कुत्र्यांच्या बाजुला आम्हाला किटकनाशकांची बॅग सापडल्याचा दावा पावा संघटनेचे अध्यक्ष सलीम चरानिया यांनी केला आहे. 


48 तासांमध्ये आम्हाला आणखी 15 मेलेली कुत्री सापडली, मीरा भाईंदरमधल्या एकाच भागात ही कुत्री सापडली आहेत. आत्तापर्यंत आम्ही 21 कुत्र्यांना पुरल्याचं चरानिया म्हणाले आहेत. 


आम्ही पाहिलेल्या दोन वेगवेगळ्या सीसीटीव्हीमध्ये एकाच माणसानं या कुत्र्यांना खायला घातलं होतं, या माणसाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी मागणीही चरानिया यांनी केली आहे. 


दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी सुट्टीवर गेले आहेत, या कुत्र्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया नवघर पोलिसांनी दिली आहे. तसंच सीसीटीव्ही फूटेज व्यवस्थित नसल्यामुळे या आरोपीवर कारवाई करता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.