मुंबई उपनगरात या दिवशी 20 टक्के पाणी कपात
शहरात भांडूपमधील संकुल येथील उदंचन केंद्र येथे काही दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. यामुळे उत्तर आणि पश्चिम उपनगरात 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
मुंबई : शहरात भांडूपमधील संकुल येथील उदंचन केंद्र येथे काही दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. यामुळे उत्तर आणि पश्चिम उपनगरात 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
5 मार्च रोजी शहर विभागातील ए, सी, डी, जी- दक्षिण, जी-उत्तर तसेच संपूर्ण पश्चिम उपनगरात 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत भांडूप संकुल येथील उदंचन केंद्रात 1200 मि.मी. व्यासाची बटरफ्लाय झडप बदलण्याचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.
याचे काम शनिवार, दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजेपासून ते दिनांक 5 मार्चच्या रात्री 1 वाजेपर्यंत 16 तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.
या कामाच्या कालावधीत शहरातील ए, सी, डी, जी/दक्षिण,जी/उत्तर या विभागात 20 टक्के पाणी कपात करण्यात येईल. तर पश्चिम उपनगरातील सर्व विभागात (वांद्रे ते दहिसर) 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.