मुंबई : मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर एटीएसच्या पथकाने झैनुलल याला अटक केली. झैनुल हा इंडीयन मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज भटकळच्या संपर्कात होता. तसेच रियाजच्या सांगण्यावरुन झैनुलने बॉम्बस्फोटासाठी रेकीही केली होती. टार्गेट निश्चित करुन त्या ठिकाणी स्फोटके ठेवली होती. 


विशेष म्हणजे झैनुल हा बॉम्बस्फोटाच्या दिवशी स्फोट करुन फरार झाला होता. तेव्हा पासून भारतीय तपास यंत्रणा झैनुलच्या शोधात होत्या. २०१३ साली झैनुलच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.