मानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार
मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.
मुंबई : मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.
गुरुवारी सकाळी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर भागात ही घटना घडलीय. मातीच्या ढिगाऱ्यातून आत्तापर्यंत १३ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय.
दोन फायर फायटिंग गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. तसंच अॅम्बुलन्सही घटनास्थळी दाखल झालीय.