मुंबई : मुंबईतल्या पवई तलाव हाऊसबोट दुर्घटनेतल्या बेपत्ता तीन जणांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. तब्बल 19 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश यशवंत भोईर, रसुल मोहमद खान आणि आतिफ लतीफ खान अशी त्यांची नावं आहेत. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला पवई तलावात एक बोट बुडाली होती. त्या बोटीतल्या एकूण आठ प्रवाश्यांपैकी 5 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. मात्र तीन जणांचा शोध रात्रीपासून सुरुच होता. यासाठी मुंबई अग्निशमन दलासोबतच एन डी आर एफ, ओ एन जी सी आणि नौदलही शोध मोहीम राबवत होतं.


अनधिकृत हाऊसबोटी...


मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस कारवाई कोणावर करणार? हे बघावे लागेल. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता तर डिसेंबर 2014 मध्ये पवईच्या हाऊसबोटमध्ये अवैधरित्या होत असलेल्या ओल्या पार्टीबद्धल 'झी 24 तास'ने आवाज उठवला होता आता तरी प्रशासन या घटनेतील दोषींवर कारवाई करणार का? असा सवाल निर्माण होत आहे 


विशेष म्हणजे, पवई तलावात हाऊस बोट अनधिकृतरित्या चालवल्या जात असल्याची तक्रार याआधीच स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती. मात्र बड्या लोकांच्या या हाऊसबोट पार्टीला नेहमीच बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिशी घातलं होतं. परिणामी बेकायदेशीर चालण्याऱ्या या हाऊसबोट पार्टीमध्ये मध्यरात्री ही दुर्घटना घडली.