मुंबई : तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेतील बचत खात्यांवरील रकमेवर मिळणारे व्याज आता सहा महिन्यांच्याऐवजी दर तीन महिन्यांनी जमा करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) देशातील सर्व बॅंकांना आदेश दिले आहेत. 


या निर्णयाचा देशभरातील कोट्यवधी बचत खातेधारकांना लाभ होणार आहे. बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे, असा आदेश आरबीआयने सर्व बॅंकांना दिलाय. 


दररोजच्या जमा रकमेवर १ एप्रिल २०१०पासून व्याज दिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर ४ टक्के तर खासगी बॅंकांतर्फे ६ टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाते. 


आरबीआयने २०११मध्ये प्रत्येक बॅंकेला बचत खात्यांवरील व्याजदर निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. परंतु एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहेत. जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे.