विरार : फटाका ऊडून दुकानावर पडल्यानं पाच दुकानं जळून खाक झाली आहेत. विरार पूर्व रेल्वे ब्रिज जवळच्या स्टेशन रोड परिसरात आज पहाटे चारच्या सुमाराला ही घटना घडली. या घटनेत पाच दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.. यात कोणतीही जिवीतहानी झाली जरी नसली तरी ऐन दिवाळीत लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पूर्व रेल्वे ब्रिजखालून रेल्वे स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर पत्र्याच्या दुकानात कापड, प्लॅस्टिक, फरसाणची अशी पाच दुकानं आहेत. रविवारी मध्यरात्री फटाक्यांमधलं रॉकेट उडून इथल्या एका दुकानावर येऊन पडलं. त्यामुळे पाच दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.


पाहा व्हिडिओ