मुंबई : सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेयरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर दोन दिवसांत एसबीआयमध्ये तब्बल ५३००० कोटी रुपये जमा झालेत. 


पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तब्बल ३१००० कोटी रुपये जमा झाले तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारपर्यंत २२००० कोटी रुपये जमा झालेत. 


मोदींनी नोटा बंद कऱण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारपासून बँका आणि एटीएमबाहेर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलीये. त्यामुळे ग्राहकांच्या सुविधेसाठी देशभरात ७०००हून अधिक मशीन्स बसवण्यात आलेत. यामुळे ग्राहक बँकेत न जाता आपले पैसे जमा करु शकतात.