मुंबई: 9 नोव्हेंबरला सरकारकडून 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर भारतात मोठ्याप्रमाणावर सोन्याची तस्करी सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाकडून अशाप्रकारे शुक्रवारी मुंबईतील एका प्रवाशाला सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. आयकर विभागाने त्या प्रवाशाकडून एकूण 2.5 किलो सोने जप्त केले आहे. त्याचा बाजार भाव 65 लाख रूपये इतका आहे.
 
मुंबई आयकर विभागाच्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून प्रणव शशिकांत नावाचा आरोपी सोने दुबईत पाठवत होता जेणे करून त्या सोन्याच्या मोबदल्यात विदेशी चलन मिळाले असते. त्यानंतर तो वाया दुबईनवरून कॅनडा जाण्याच्या विचारात होता, परंतू आयकर विभागाला शंका आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.


आयकर विभागाच्या चौकशी दरम्यान आरोपीकडून 1 किलो सोन्याचे एक बिस्कीट आणि 100 ग्रामचे 15 बिस्कीट जप्त करण्यात आली आहेत.


आरोपी शशिकांत पेशाने प्रॅापर्टी एजंट आहे. त्याने हे सोने अवैधरित्या ग्रे बाजारातून म्हणजे जिथे बेकायदेशीररित्या वस्तुंची खरेदी आणि विक्री होते. त्या सोन्याची बाजार किंमत 65 लाख रूपये इतकी आहे परंतु आरोपी शशिकांतने ९० लाख रूपयाला विकत घेतले होते. आरोपी सध्या आयकर विभागाच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.