मुंबईत ७ पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर
मुंबईत आलेले पेंग्विन्स आता आठवडाभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये वास्तव्याला असलेल्या सात पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर मिळालंय.
मुंबई : मुंबईत आलेले पेंग्विन्स आता आठवडाभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये वास्तव्याला असलेल्या सात पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर मिळालंय.
२० कोटी रूपये खर्चून बांधलेल्या या त्यांच्या नव्या घरात त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जातेय. त्यांना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जातेय.
बोंबील हे पेग्विनसचं आवडतं खाद्य आहे. त्यांच्यासाठी आता मोठा वॉटर टँक उपलब्ध करुन देण्यात आल्यानं पेंग्विन खूष आहेत.