मुंबई : तुमच्या राजाला साथ द्या, हे मनसेचं निवडणुकीत बनवलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे, 'आज तक' या हिन्दी चॅनेलच्या सर्वेतही मुंबई राजाला म्हणजे राज ठाकरे यांना 'सात' देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 'आज तक'च्या सर्वेत मनसेला ५-७ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. यावरून मुंबई राजाला ७ देणार असं म्हणता येईल.


'आज तक'ने आपल्या सर्वेत भाजपला ८०-८८, तर शिवसेनेला ८६-९२ जागा मिळणार आहेत, काँग्रेसला ३० ते ३४ तर राष्ट्रवादीला सर्वात कमी ३ ते ६ जागा मिळणार आहेत. इतरांना २ ते ७ जागांवर समाधान मानावं लागणार आहे, हा  'आज तक' न्यूज चॅनेलचा सर्वे आहे.