मुंबई : आमिर खानने वादग्रस्त मुस्लिम प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध केला आहे. गुरुवारी ईदच्या निमीत्त मीडियासोबत बोलताना आमिर म्हणाला, झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, तर प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. दहशतवाद पसरवणाऱ्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. 
 


का केला विरोध आमीरने...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमीर खानला असहिष्णूतेवर भाष्य केल्यावर विरोधाचा सामना करावा लागला होता. आता झाकीर नाईक याच्याविरूद्ध बोलून तो नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी दंगल सिनेमासाठी आपली इमेज सुधारावी यासाठी आमीरची ही मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियात केली जात आहे. 


 दरम्यान, झाकीर नाईक यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिले आहे.  मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 


 तर, रजा अकॅडमीने मुंबईत नाईकविरोधात आंदोलन केले आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.


 दुसरीकडे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईक यांची चौकशी सुरु केली आहे. मुंबईत नाईक यांच्या कार्यालयाभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 
 
 बांगलादेशातील ढाका येथे हल्ला करणारे दोन दहशतवादी झाकीर यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचे म्हटले गेले आहे. बांगलादेश सरकारने याबाबत भारत सरकारकडून मदत मागितली आहे. नाईक यांची भाषणे ही मुस्लिम दहशतवादाला प्रोत्साहन देणारी असल्याचे आता म्हटले जाऊ लागले आहे.