मुंबई : आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खासगी वाहनाला लाल दिवा बसवून घेतला आहे, ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिती शर्मा-मेनन यांनी पंकजा यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे,  'पंकजा मुंडे या महागडी कार वापरु शकतात. मात्र, कारचE कर भरु शकत नाहीत. शिवाय, त्यांच्या रेंज रोव्हरचा क्रमांक DL 12 CD 1212 आहे. राज्य शासनाचा लाल दिवा या कारला बसवण्यात आला आहे, कारची नोंदणी दिल्लीतील रॅडिको एन व्ही डिस्टीलरीस नावाने झाली आहे. या कंपनीचे संचालक पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे हे आहेत'. 


आम आदमी पक्षाने राज्य वाहतूक आयुक्त श्याम वर्धने यांनी याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केलीय.


'आप'ने पंकजा यांच्यावर आणखी आरोप करताना म्हटलं आहे, 'दिल्लीत नोंदणी असलेली कार इतर राज्यात घेऊन जात असताना राज्य बदलीची एनओसी द्यावी लागते. मात्र, दिल्ली वाहतूक शाखेकडे अशाप्रकारची कुठलीही एनओसी देण्यात आली नाही. किंबहुना एनओसीसाठी साधा अर्जही करण्यात आला नाही.'