राज ठाकरेंसोबतच्या फोटोचा असाही गैरवापर
राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोचा कोण कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही, शिवाय असे फोटो पाहून `याड` लागणाऱ्यांचीही कमी नाही.
मुंबई : राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोचा कोण कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही, शिवाय असे फोटो पाहून 'याड' लागणाऱ्यांचीही कमी नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबतचे फोटो दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची एक तक्रार दाखल झाली आहे.
आपलं नाव अल्ताफ मर्चंट आहे, आपलं सिनेसृष्टीत मोठं नाव आहे, असं खोटं सांगून बॉलीवूडमध्ये काम मिळवण्याचं आमिष दाखवून एका तरूणीची फसवणूक करण्यात आली आहे.
अल्ताफ असं नाव सांगत असलेल्या व्यक्तीने तिला राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवले आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचंही त्याने सांगितलं.
अल्तापह मर्चंट या व्यक्तीन सिने निर्माता असल्याचे खोटे सांगत बॉलिवूडमध्ये काम देऊन असे आमिष दाखवले होते.
अल्ताफने आपल्याला जबरदस्तीने ड्रग्सचे व्यसन लावले, तसेच अपहरण करून बलात्कार केल्याचं या तरूणीने म्हटलं आहे.
यानंतर ही तरूणी ड्रग्जचं व्यसन सोडवण्यासाठी देहरादूनला गेली,व्यसनमुक्तीचे उपचार घेतल्यानंतर मुंबईत परतली.
अल्ताफ विरोधात तिने लढा सुरू केला. १४ मे रोजी वांद्रे पोलीस स्टेशनला या तरूणीने तक्रार दाखल केली. अल्ताफवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अल्ताफचं राजकीय वजन मोठं आहे, त्यामुळे त्याला पोलीस अटक करत नसल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. अल्ताफच्या घरात इतर मुलींचे कपडे दिसून आले होते, म्हणून आपण पळ काढला, त्याने अनेकांना फसवल्याचं यावरून नाकारता येत नसल्याचंही पीडित तरूणीने म्हटले आहे.