महादेव जानकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलं आहे.
मुंबई : निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलं आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यांना त्यांच्या या कृत्याबद्दल, महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आलाय.
महादेव जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, तसेच उमेदवाराला कपबशी चिन्ह द्यावे, म्हणून दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती.
निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे. ज्या जेसा मोटवानीसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 ब ची निवडणूकही आयोगाने रद्द केली आहे.
इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.